संयुगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी

About Us
आमच्या बद्दल माहिती

संयुगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मर्यादित

नमस्कार शेतकरी बांधवांनो,
संयुगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीमध्ये आपले स्वागत आहे.
भारतातील अर्थव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती आहे. 70 टक्के भारताची अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडित आहे. त्यामुळेच भारत देशात शेतीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु आज रोजी शेतकऱ्यांसमोर असलेल्या विविध प्रश्नांमुळे जगाच्या अन्नदात्याची परिस्थिती फारच बिकट होत चाललेली आहे. म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन व उत्पादित मालाचा भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबत तंत्रज्ञानाचा देखील वापर करावा यासाठी आम्ही आग्रही आहोत.
आज रोजी संयुगा ॲग्रो बियाणे क्षेत्रात काम करीत असून आम्ही सोयाबीन, गहू, हरभरा, तूर, मूग, मका, उडीद इत्यादी वाणाचे बियाणे पुरवठा करण्याचे काम करतो. आजपर्यंत आमच्या कंपनीच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये असलेली शुद्धता व उच्च उगवण क्षमता कायम राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

बियाणे विश्वासाचे – 100% शुद्धतेचे
शुद्ध व उच्च गुणवतेचे बियाणे
gahu
soyabean-seeds

आमच्या द्वारे पुरविठा करण्यात आलेले शुद्ध व उच्च उगवण क्षमता असलेले बियाणे व नाफेड केंद्रावरील पारदर्शकता यामुळे आम्ही शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरलो आहोत. कंपनीच्या तज्ञ, उच्चशिक्षित व अनुभवी कर्मचारी वर्गाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना उत्पादनासाठी योग्य वाणाची निवड कशी करावी, पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे याचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन करतो. उत्पादित मालाची साठवणूक व विक्रीसाठी उपलब्ध बाजार आणि बाजारभाव याचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गदर्शन नियमित व्हॉट्सॲप ग्रुप व चॅनल च्या माध्यमातून करीत आहोत.
कंपनीच्या पारदर्शक व विश्वास पात्र धोरणामुळेच आज कंपनीसोबत 2000 पेक्षा जास्ती शेतकरी जोडले गेलेले असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कंपनी काम करीत आहे. म्हणूनच आम्ही " बियाणे विश्वासाचे....प्रतीक शुद्धतेचे " ही टॅगलाईन घेऊन मार्गक्रमण करीत आहोत.

संयुगा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी

आम्ही कशा प्रकारे कामे करतो:

"गुणवत्ता हे आमचे मुख्य ध्येय आहे, हायब्रिड विकासापासून मार्केटिंगपर्यंत, आणि प्रत्येक टप्प्यावर याची सतत तपासणी केली जाते, अणु बियाण्यांपासून व्यावसायिक बियाण्यांपर्यंत. शारीरिक शुद्धता, अंकुरण, ताकद, बियाण्याचे आरोग्य यासाठी इन-हाऊस लॅब चाचणी घेतली जाते. तसेच, जीन शुद्धता तपासण्यासाठी ग्रो आउट टेस्ट, डीएनए फिंगरप्रिंटिंग इत्यादीचे वापरले जाते. आमच्या लॅब परिणामांची तपासणी सरकारी आणि मान्यता प्राप्त लॅबमध्ये समान चाचणी करून केली जाते."

Sanyuga Agro Producer Company Limited
सर्वेक्षण

मातीची गुणवत्ता आणि परिस्थितीचा अभ्यास करतो.

Agricultural-Seeds-small-1
बियाणे निवड

उच्च गुणवत्तेचे आणि योग्य बियाणे निवडतो

Sanyuga Agro Producer Company Limited
पाणी व्यवस्थापन

आवश्यक पाण्याचा व्यवस्थापन करतो.

Sanyuga Agro Producer Company Limited
संग्रहण

उत्पादनाचे योग्यरीत्या संकलन आणि संरक्षण करतो

Mobile No.

+918530497511

Our Address

बुलढाणा

Send an Email

info@sanyugaagro.com

back top